Wednesday, July 7, 2010

गाणे स्वत्वाचे..

लोकात बावळा दिसतो मी,
मनात एकटा असतो मी..
नवी निराशा घरी येता,
हसून स्वागत करतो मी..

शम्भर वेळा पडतो मी,
हज़ारदा अडखळतो मी..
मन्जिल कुठंय कळत नाही,
इथंच तेवढा चुकतो मी..

प्रवाही उलटा पोहतो मी,
चुकिचे पर्वत चढतो मी..
डेस्टीनी च्या शोधात नेहमी,
भाबडा असाच फसतो मी..

हायवेज़ कधी सोडुन देतो,
कच्ची सडक पकडतो मी.
मनाची कॉर्ड जुळते जेथे,
तोच महामार्ग मानतो मी..

पब्लिक मध्ये असतो मी,
त्यांची मतं ऐकतो मी..
मजकुर जो रुचला नाही,
अशी पानं फाडतो मी..

त्यांनी माझ्याशी वागावे जसे,
त्यांसी तसे वागवीतो मी..
नात्यात ठेच लागते तेंव्हा,
स्वतःवरंच रुसतो मी..

दुनियेत बेहिशोबी,
जरी कुणास वाटलो मी..
विधात्याशी हिशोब मात्र,
न चुकता मांडतो मी..

घडतो अनर्थ जेंव्हा,
थोडासाच, तरी रडतो मी..
नव्या श्वासाने वाट माझी,
पुढे अखंड चालतो मी..

पुढे अखंड चालतो मी..


Visit blogadda.com to discover Indian blogs