Sunday, November 1, 2009

तुझे अबोल लेणे..

माझे मलाच छळते, माझे उदास गाणे,
नकळत कोरलेले, तुझे अबोल लेणे॥

भरकटलं पाखरू, मी जहरी तमात अकेला,
भासताच शोधत फिरतो, हळूवार तुझे बोलणे॥

चालताना तुझी वाट, प्रवास वेशितच अडला,
तुही वेडी आले नाही, तुझेही कधी बोलावणे॥

माझे मलाच छळते, माझे उदास गाणे..

ग़ज़ल

नुसतेच भावनांना, आवरत जगायाचे,
दिवस गेले, ऋतुंनी भरभरून जगायाचे॥

मातीत अंगणाच्या, स्वर्ग शोधताना,
दिवस गेले, नभाशी हरवून जगायाचे॥

दृष्टीस सापडेना, ती वाट चांदण्याची,
दिवस गेले, स्वप्न पांघरून जगायाचे॥

आताशा स्वप्नातही, स्वप्न पडत नाहीत,
दिवस गेले, भाबड्या आशेवर जगायाचे॥

जा..

फुलवाटांची वाट पाहणे, आज तू विसरून जा,
काटेरी ही वाट सदाची, रक्ताने सजवून जा॥

दिवसांमागुन दिवस चालले, आयुष्य थोड़े समजून घे,
जीवनाची ही बाग़ फुलाविण्या, प्रेमरस बरसून जा॥

दोन क्षणांची सोबत अवघी, भासावी शतकापरि,
माझ्या हृदयी दोन जीवांचे, गीत असे कोरुन जा॥

घडता घडता..

घडता घडता घडले सारे, दोष कुणाला देऊ,
हसता हसता दिसले तारे, कसे स्वताला आवरू..

फ़क्त फसवी म्रृगजळच, होती आजन्म वाळवंटात,
तहानलेच राहिले सागर, माझ्या विषण्ण अंतरात..

उघडला तो हरेक दरवाजा, अंधारच साठवून होता,
अणि उगवत्या सुर्याचा शोध, अन्धाराताच मावळला होता..