Tuesday, October 5, 2010

एकांतीचे गूज

वळल्या मुठीत क्षण पिसा-यांचे होते..
खर्चले बेधुंद वय नजा-यांचे होते..

आठवे ती वीज जेंव्हा नभावरी कडाडली,
जाणिवेस भय त्यांच इशा-यांचे होते..

थांबला पाऊस आणि हरवल्या खाणाखुणा,
वाहून गेले घर ते कोण्या बिचा-यांचे होते..

भव्यतेचे अथांग मंदिर भग्नतेच्या सापळ्यात,
असले हे प्रताप नास्तिक पुजा-यांचे होते..

दूभागले भविष्य न इतिहास परत साधू शकला,
कळून चुकले प्रवास आपुले भिन्न ता-यांचे होते..