Saturday, February 18, 2012

प्रवाह..



मीच झरा होऊन निघालो,
प्रवास कोणता कुठल्या गावा..
पाझरले पाषाण अंतरी,
वाहण्यातून जगणे लुटवाया..!!

युगायुगांची काळकोठडी,
थराथरातून बुजले पत्थर..
निबिड किर्र बोजड जीवन,
सरीतेतून हलके करवाया..

पाझरले पाषाण अंतरी,
वाहण्यातून जगणे लुटवाया..!!

झिजणे खडकांचे होई,
गार गार वाहणारे अमृत..
मृत्युच्या वेशीतून जाता,
नव जन्माचा अवसर घ्याया..

पाझरले पाषाण अंतरी,
वाहण्यातून जगणे लुटवाया..!!

बदल नव्हे रूपांतर श्रेष्ठ,
मी पासुन तो पर्यंत..
खडकाच्या मृत्युतून झुळझुळ,
जीवनाचे संगीत घुमवाया..

पाझरले पाषाण अंतरी,
वाहण्यातून जगणे लुटवाया..!!

Thursday, November 3, 2011

आज ही तितका नव्हे..


मी कधी नव्हतोच माझा,
आज ही तितका नव्हे..!
रंगला नव्हताच रंग,
आज ही तितका नव्हे..!!

राहिलो त्यांच्यात अन मी,
म्हणले त्यांसी आपुले..!
मी कधी नव्हतोच त्यांचा,
आज ही तितका नव्हे..!!

प्रश्न पडला आजवर का,
प्रीत नाही जोडली..!
प्रश्न हा नव्हताच साधा,
आज ही तितका नव्हे..!!

आजन्मीचे एकटेपण,
विसरले त्यांच्यासवे..!
पण संपला नव्हताच भास्,
आज ही तितका नव्हे..!!

वेळ ही आलीच आहे,
नवी अक्षरे गिरवायची..!
निरक्षर ही नव्हतो कधीच,
आज ही तितका नव्हे..!!

Wednesday, November 2, 2011

आम्ही कोण?


फुले आम्हीच भ्रमर आम्हीच,
प्रभुंची अवघी बाग़ आम्हीच..!
फुलात सुगंधीत विविध रंगीचा,
अखंड आनंद अनुभव आम्हीच..!!  

वक्र आम्हीच चक्र आम्हीच,
चित्रकारीचे ते आकार आम्हीच..!
सरळ कधी, वाकडे च कधी,
नज़रेचे फसवे डाव आम्हीच..!!

यासम आम्हीच त्यासम आम्हीच,
आमुच्या सारखे एकमेव आम्हीच..!
विरुद्ध ध्रुव साधतो समर्थ,
भल्या - बु-याचे संगम आम्हीच..!!

धवल आम्हीच कृष्ण आम्हीच,
सृष्टीचे सर्व रंग आम्हीच..!
असू जरी बहू रंगात विभक्त,
चित्रात सदैव संपूर्ण आम्हीच..!!

Sunday, October 23, 2011

निशब्द..


निशब्द काही.. निशब्द जरा..
निशब्द पुन्हा.. निशब्द असा..
निशब्द जसा.. निशब्द आत..
निशब्द तसा.. निशब्द आज..
निशब्द कोण.. निशब्द मी..
निशब्द कसा.. निशब्द निशब्द..

निशब्द तु.. निशब्द का..?
निशब्द नेहमीच..? निशब्द आज..?
निशब्द असाच.. निशब्द खास..
निशब्द वेड.. निशब्द मनात..
निशब्द खोल.. निशब्द रान..
निशब्द नज़रेत.. निशब्द आकाश..
निशब्द माझी.. निशब्द अभिव्यक्ती..
निशब्द तुझ्यात.. निशब्द मीच..

निशब्द दूर.. निशब्द उंच..
निशब्द पार.. निशब्द फ़ार..
निशब्द जरी.. निशब्द अंतर..
निशब्द साथ.. निशब्द हात..
निशब्द उन्हं.. निशब्द ताप..
निशब्द सावली.. निशब्द गार..
निशब्द तू.. निशब्द मी..
निशब्द प्रिती.. निशब्द प्रेम..

निशब्द बरा.. निशब्द मी..
निशब्द हे.. निशब्द ते..
निशब्द प्रश्नं.. निशब्द कारणं..
निशब्द समजूत.. निशब्द मीलन..
निशब्द गप्पा.. निशब्द गोष्टी..
निशब्द हास्य.. निशब्द भेद..
निशब्द प्रहर.. निशब्द वेळ..
निशब्द आलिंगण.. निशब्द भेट..
निशब्दतेतच.. निशब्द विश्राम..
निशब्द माझा.. निशब्द संवाद..!!

Wednesday, September 28, 2011

प्रेममयी..


मिटवुनि स्वत:स पुन्हा, प्रेम वर्षा बरसू दे रे..
धरती तु ही मेघात तेंव्हा, प्रेम गंगा वाहू दे रे..

मी खरे अस्तित्व माझे, जाणले जळताक्षणी,
तु ही घे जाळून स्वतःला, प्रेम प्रकाश पसरू दे रे..

ये जरा बाहेर आणि, नाच या मोरांसवे वा,
येऊ दे वेली घरात, प्रेम गजरा माळू दे रे..

Thursday, June 2, 2011

स्वगत

आपली तोंडं लहान घास तरीही मोठा
आपली असीम शक्ती विश्वास तरीही खोटा

दिवसाढवळ्या आपण डोळे मिटून सुखात बसू
रात्र पडता प्रकाशाची किरणे शोधत रडत असू

देह आपला मोठा पण सावली तरीही लहान
चार दुःखे पार करुनि समजतो स्वःतास महान

रात्र पडता पडता होते पळता पळता भुई थोडी
सुर्य उजाडताच सांगे मी कधी भिलोच नाही

फसवे हे भाव तुझेच तुला कळायला हवे
स्वःताशीच असे काही कधी बोलायला हवे

Friday, December 24, 2010

असे आहे

ना भरती ना ओहोटी कोण्या चंद्राशी नाते ना..
लाटेस आता किना-यासी धावण्याची कारणे ना..

फुलतात फुले जशी येतात भ्रमर आसपाशी..
आम्ही आहो आलिप्त काय देणे-घेणे जगाशी..

आम्ही अलविदा घेतो सर्व क्षुद्र भावनांचा..
सर्व कोरड्या नजरांचा गोठलेल्या ह्रद्यांचा..

चुक झाली मुजरे जे आजवरी धाडत आलो..
आत्मा परमेश्वरास उगाच बेकिम्मत करत आलो..

आज पाहू उद्या पाहू तुम्हास कधी आपणास पाहू..
जाहले तर दर्शन हरिचे वा खुशाल सैतान पाहू..

आमची पाटीच कोरी लिहीणारा एक हात पाहतोय..
कारागृहाच्या भिंतीगत एका सावरकराची वाट पाहतोय..