Friday, December 24, 2010

असे आहे

ना भरती ना ओहोटी कोण्या चंद्राशी नाते ना..
लाटेस आता किना-यासी धावण्याची कारणे ना..

फुलतात फुले जशी येतात भ्रमर आसपाशी..
आम्ही आहो आलिप्त काय देणे-घेणे जगाशी..

आम्ही अलविदा घेतो सर्व क्षुद्र भावनांचा..
सर्व कोरड्या नजरांचा गोठलेल्या ह्रद्यांचा..

चुक झाली मुजरे जे आजवरी धाडत आलो..
आत्मा परमेश्वरास उगाच बेकिम्मत करत आलो..

आज पाहू उद्या पाहू तुम्हास कधी आपणास पाहू..
जाहले तर दर्शन हरिचे वा खुशाल सैतान पाहू..

आमची पाटीच कोरी लिहीणारा एक हात पाहतोय..
कारागृहाच्या भिंतीगत एका सावरकराची वाट पाहतोय..

Tuesday, October 5, 2010

एकांतीचे गूज

वळल्या मुठीत क्षण पिसा-यांचे होते..
खर्चले बेधुंद वय नजा-यांचे होते..

आठवे ती वीज जेंव्हा नभावरी कडाडली,
जाणिवेस भय त्यांच इशा-यांचे होते..

थांबला पाऊस आणि हरवल्या खाणाखुणा,
वाहून गेले घर ते कोण्या बिचा-यांचे होते..

भव्यतेचे अथांग मंदिर भग्नतेच्या सापळ्यात,
असले हे प्रताप नास्तिक पुजा-यांचे होते..

दूभागले भविष्य न इतिहास परत साधू शकला,
कळून चुकले प्रवास आपुले भिन्न ता-यांचे होते..

Monday, September 13, 2010

अनाहूत

अनोळखी वाटांचे वेड लागलेले,
पटावरी दैवाचे खेळ मांडलेले..

सून्या धरतीस आकाशाचे हितगुज,
जलधीच्या आत नवे मेघ दाटलेले..

सरिता प्रवाही दूर निघूनीया गेली,
पर्वताचे घर काहीसे दुभागलेले..

मुठीतुनी नकळत गळले जे अलगद,
हसरे ते क्षण सारे वेच साचलेले..

पेटवू अशी दिपमाळ मनमनांची,
तमाचे हात हाती घेत गांजलेले..

Sunday, August 8, 2010

पुर्णत्वास..

उद्विग्न भावनेचा, व्यवहार पुर्ण व्हावा,
वा वेदनेचा, स्वीकार पुर्ण व्हावा..

थेंब थेंब जीवन असे, ठायी ठायी म्रुत्यू,
वादळात अखेर नौकेचा, संहार पुर्ण व्हावा..

भुकेली ती जनता जी, रस्त्यांवरी गांजली हो,
का कुणा न वाटे त्यांचा, उद्धार पुर्ण व्हावा..

सत्तेचे हे खेळ आंधळे, जन्म जन्म पाहती हो,
लाचार मनात क्रांतीचा, अंगार पुर्ण व्हावा..

चालती जे दिर्घ त्यांस, पंढरीच्या मंदिरात,
ह्र्द्यस्थ माउलींचा, साक्षात्कार पुर्ण व्हावा..

आत्म्याची भाकीतं सारी, म्रुत्यूचा भरवसा काय,
पॄथ्वीवरीच स्वर्गाचा, आकार पुर्ण व्हावा..

Wednesday, July 7, 2010

गाणे स्वत्वाचे..

लोकात बावळा दिसतो मी,
मनात एकटा असतो मी..
नवी निराशा घरी येता,
हसून स्वागत करतो मी..

शम्भर वेळा पडतो मी,
हज़ारदा अडखळतो मी..
मन्जिल कुठंय कळत नाही,
इथंच तेवढा चुकतो मी..

प्रवाही उलटा पोहतो मी,
चुकिचे पर्वत चढतो मी..
डेस्टीनी च्या शोधात नेहमी,
भाबडा असाच फसतो मी..

हायवेज़ कधी सोडुन देतो,
कच्ची सडक पकडतो मी.
मनाची कॉर्ड जुळते जेथे,
तोच महामार्ग मानतो मी..

पब्लिक मध्ये असतो मी,
त्यांची मतं ऐकतो मी..
मजकुर जो रुचला नाही,
अशी पानं फाडतो मी..

त्यांनी माझ्याशी वागावे जसे,
त्यांसी तसे वागवीतो मी..
नात्यात ठेच लागते तेंव्हा,
स्वतःवरंच रुसतो मी..

दुनियेत बेहिशोबी,
जरी कुणास वाटलो मी..
विधात्याशी हिशोब मात्र,
न चुकता मांडतो मी..

घडतो अनर्थ जेंव्हा,
थोडासाच, तरी रडतो मी..
नव्या श्वासाने वाट माझी,
पुढे अखंड चालतो मी..

पुढे अखंड चालतो मी..


Visit blogadda.com to discover Indian blogs

Saturday, June 12, 2010

Odh

Belagaam hridyacha, tol dalamale,
tujhiya swapnancha, gandha daravale..

vhayache tujhiyashi, ekajeev ase,
jasa kaalokh, chandanyaat viraghale..!!

ek vaarya chi jhuluk jashi,
odhanees tujhya jhoke ghei..

mihi tasaach bindi vhave,
nayana chya darbaari sinhasan patakave..!!

Muntazeer..

तुझ्या इंतज़ारचा, आज पहिला दिवस आहे..
तुझ्या आठवणीचा, आज मोगरा फुलत आहे..!!

तू येणार म्हणून, अबोल भिंती बोलू लागल्या..
तू यावीस म्हणून उम्बरठा  दार अडवत आहे..!!

भास् नेहमीचा तुझा, येणे तुझे न सत्य झाले..
न दिलेले वचन तुला, मी माझेच पाळत आहे..!!

प्रवाही मी बेफिक्र, अड़ते न वाट माझी..
अर्पिले सरितेत जीवन, सागरात जे वाहत आहे..!!

Saturday, May 8, 2010

maajha mann..

माझ मन, माझा देश..
मी आरसा, अन मीच वेष..

माझी मजल, परिघापुरती..
आखतो मी, जिथे थांबतो ती....

माझी हार, माझी जीत..
माझ्या यात्रेची, माझी रीत..

मनाचा झेंडा, अजिंक्य राहे..
माझी हार, तोवर अशक्य आहे..!!

Tuesday, May 4, 2010

Hi Dear Reader,
well i wud like to tell you the background behind this poem.
i composed this poem after watching the movie 'Gulaal' by Anuraag Kashyap. its a great movie. please watch it..
the poem is about us.
we, the human beings.
C how we go on making ourselves blind, deaf & finally dead..!!


शौक से देखे थे सपने ,
आँखों पे पट्टी बंधने से पहले..
जुबान को जब काटा नहीं था,
कुछ नगमे हमने भी गाए थे पहले..

सर ऊँचा रहता था जब,
कुछ राहे ऐसी भी चले थे हम..
दिल की धडकनों में बसे,
किसी की पुकार के प्यासे थे हम..

शोरोगुल न था जब,
अपनी आवाज सुनी थी..
दिल के रुकते ही,
न जाने कहाँ चल बसी..

आग पर चलते हैं अब तक,
अफ़सोस हैं न एहसास हैं..
आँख में सपने नहीं हैं,
न चेहरे पर मुस्कान हैं..

रख ही रख बची हैं,
दिल का नामोनिशान नहीं..
खोखले हैं अन्दर से,
सुकी लकड़ी जान नहीं..

दिल के लेने देने का,
कोई रिवाज़ नहीं हैं..
तहखानो में कैद ज़िन्दगी,
ज़िन्दगी नहीं हैं..

दुनिया की सुनते आये थे,
दिल से अपनी कभी बनी नहीं..
क़त्ल हुआ जिस रात उसका,
सुबह कभी फिर लौटी नहीं..

क्या खंजिरो पे कसे,
हाथ वोह मेरे न थे..
रोक लेते वक़्त पर तो,
हम अब तक जिंदा होते..!!

Friday, April 30, 2010

raas nahi..!!

नदियातील एकाकी, नाव होने रास नाही,
सोनेरी महालाचा, राव होने रास नाही..!!

जिगरी दोस्तीचा, किती सांगू लाभला दिलासा,
अन्य कोणत्य सुखाचा, मज ध्यास घेणे रास नाही..!!

बंधनाच्या पार, दुनिया आजमवुन पाहिली,
प्राक्तनाच्या सर्व, सीमा तोदुनिया पाहिली..!!

कलाली यारी जेंव्हा, धावुनी आलो घरी,
मैत्रीच्या देशातून, आता दूर जाने रास नाही..!!

nava mi



कालच्या कादंबरीचा, हा नवा अध्याय आहे,
अद्न्यात अविरत शोधाचा, हा नवा अवतार आहे..!!

काल नियतिपुढे जाहल्या, स्वप्न इच्छ्यांच्या कत्तली,
जगाने देवमर्जीने आता, हा नवा सुविचार आहे..!!