Sunday, August 8, 2010

पुर्णत्वास..

उद्विग्न भावनेचा, व्यवहार पुर्ण व्हावा,
वा वेदनेचा, स्वीकार पुर्ण व्हावा..

थेंब थेंब जीवन असे, ठायी ठायी म्रुत्यू,
वादळात अखेर नौकेचा, संहार पुर्ण व्हावा..

भुकेली ती जनता जी, रस्त्यांवरी गांजली हो,
का कुणा न वाटे त्यांचा, उद्धार पुर्ण व्हावा..

सत्तेचे हे खेळ आंधळे, जन्म जन्म पाहती हो,
लाचार मनात क्रांतीचा, अंगार पुर्ण व्हावा..

चालती जे दिर्घ त्यांस, पंढरीच्या मंदिरात,
ह्र्द्यस्थ माउलींचा, साक्षात्कार पुर्ण व्हावा..

आत्म्याची भाकीतं सारी, म्रुत्यूचा भरवसा काय,
पॄथ्वीवरीच स्वर्गाचा, आकार पुर्ण व्हावा..