Sunday, November 1, 2009

ग़ज़ल

नुसतेच भावनांना, आवरत जगायाचे,
दिवस गेले, ऋतुंनी भरभरून जगायाचे॥

मातीत अंगणाच्या, स्वर्ग शोधताना,
दिवस गेले, नभाशी हरवून जगायाचे॥

दृष्टीस सापडेना, ती वाट चांदण्याची,
दिवस गेले, स्वप्न पांघरून जगायाचे॥

आताशा स्वप्नातही, स्वप्न पडत नाहीत,
दिवस गेले, भाबड्या आशेवर जगायाचे॥

No comments:

Post a Comment