तुझ्या इंतज़ारचा, आज पहिला दिवस आहे..
तुझ्या आठवणीचा, आज मोगरा फुलत आहे..!!
तू येणार म्हणून, अबोल भिंती बोलू लागल्या..
तू यावीस म्हणून उम्बरठा दार अडवत आहे..!!
भास् नेहमीचा तुझा, येणे तुझे न सत्य झाले..
न दिलेले वचन तुला, मी माझेच पाळत आहे..!!
प्रवाही मी बेफिक्र, अड़ते न वाट माझी..
अर्पिले सरितेत जीवन, सागरात जे वाहत आहे..!!
No comments:
Post a Comment