अनोळखी वाटांचे वेड लागलेले,
पटावरी दैवाचे खेळ मांडलेले..
सून्या धरतीस आकाशाचे हितगुज,
जलधीच्या आत नवे मेघ दाटलेले..
सरिता प्रवाही दूर निघूनीया गेली,
पर्वताचे घर काहीसे दुभागलेले..
मुठीतुनी नकळत गळले जे अलगद,
हसरे ते क्षण सारे वेच साचलेले..
पेटवू अशी दिपमाळ मनमनांची,
तमाचे हात हाती घेत गांजलेले..
No comments:
Post a Comment