Saturday, February 18, 2012

प्रवाह..



मीच झरा होऊन निघालो,
प्रवास कोणता कुठल्या गावा..
पाझरले पाषाण अंतरी,
वाहण्यातून जगणे लुटवाया..!!

युगायुगांची काळकोठडी,
थराथरातून बुजले पत्थर..
निबिड किर्र बोजड जीवन,
सरीतेतून हलके करवाया..

पाझरले पाषाण अंतरी,
वाहण्यातून जगणे लुटवाया..!!

झिजणे खडकांचे होई,
गार गार वाहणारे अमृत..
मृत्युच्या वेशीतून जाता,
नव जन्माचा अवसर घ्याया..

पाझरले पाषाण अंतरी,
वाहण्यातून जगणे लुटवाया..!!

बदल नव्हे रूपांतर श्रेष्ठ,
मी पासुन तो पर्यंत..
खडकाच्या मृत्युतून झुळझुळ,
जीवनाचे संगीत घुमवाया..

पाझरले पाषाण अंतरी,
वाहण्यातून जगणे लुटवाया..!!

No comments:

Post a Comment